राष्ट्रीय स्तरावरिल लघु फ़िल्म महोत्सवात सहभागी व्हा

उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांचे आवाहन;स्वच्छते संबंधी फिल्म आवश्यक:केंद्र सरकारचे आयोजन

जल शक्ती मंत्रालय केंद्र सरकार यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील “फिल्मोंन का अमृत महोत्सव”याचे आयोजन करण्यात आले आहे. याकरीता जिल्ह्यातील लघु फिल्म मेकर यांनी पाणी व स्वच्छता विषयावर लघुचित्रपट तयार करुन दिनांक 30 जुन 2021 पर्यत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालय, केंद्र सरकार यांच्या वेबसाईटवर सादर कराव्यात असे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छ्ता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यानी केले आहे. हागणदारी मुक्त गाव अधिक (ODF+) ला चालना देण्यासाठी स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण (एसबीएमजी) च्या फेज 2 व भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाचे पेयजल व स्वच्छता विभागाच्या वतीने ‘स्वच्छता फिल्मोंन का अमृत महोत्सव’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. सदर स्पर्धेकरिता विघटनशिल कचरा व्यवस्थापन, गोबरधन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, ग्रे वॉटर मॅनेजमेंट, मैला गाळ व्यवस्थापन अशा पाच विषयावर शॉट फिल्म बनवावयाची आहे. चित्रपटाचा कालावधी 1 मिनिट ते 5 मिनिटांच्या दरम्यान असणे गरजेच आहे. या स्पर्धेकरीता 10 वर्षावरील सर्व नागरीक सहभागी होऊ शकतात. शॉट फिल्म मान्यताप्राप्त भारतीय कोणत्याही बोली भाषेत तयार करु शकता. या स्पर्धेच्या अधिक माहिती करीता व आपण तयार केलेली शॉट्फिल्म उपलोड करीता व बक्षिस रक्कमांच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाच्या https://innovateindia.mygov.in/sbmg-innovation-challenge/ या वेबसाईटला भेट द्यावी. जिल्ह्यातील शॉट फिल्म मेकर यानी या स्पधेत सहभाग घ्यावा असे आवाहन श्री. विनायक ठाकुर यानी केले आहे.

You cannot copy content of this page