*💫कणकवली दि.२१-:* कणकवली तालुक्यातील खारेपाटण लोकसहभागातून निर्माण करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरसाठी नडगिवे येथील श्री.गांगेश्वर पावनाईदेवी ग्रामस्थ मंडळ नडगिवे (रजि.) मुबई /ग्रामीणच्यावतीने रोख ११०००/- रुपये रकमेचा धनादेश व रुग्णांसाठी बिस्कीट पुडे देण्यात आले. खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्याकडे नुकताच हा कोविड सेंटरच्या मदतीकरिता देण्यात आलेला ११००० /- रकमेचा धनादेश नडगीवे ग्रामस्थ मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उवस्थित सुपूर्द करण्यात आला. यावेळी श्री गांगेश्वर पावणाईदेवी ग्रामस्थ मंडळाचे मुंबई अध्यक्ष – प्रकाश श्यामराव मण्यार, ग्रामीण अध्यक्ष दिलीप विठ्ठल मण्यार,सेक्रेटरी – भास्कर शंकर राणे,चंद्रकांत सुरबाजी मण्यार,खजिनदार – अरविंद श्रीकृष्ण मण्यार,विनायक दाजी मण्यार,नडगीवे गावचे सरपंच श्री अमित मांजरेकर, तसेच सचिन तानाजी मण्यार,संतोष पुणाजी मण्यार,प्रकाश शंकर राणे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. याबरोबरच खारेपाटण उपसरपंच इस्माईल मुकादम, ग्रामपंचयत सदस्य योगेश पाटणकर, शमशुद्दीन काझी,ऋषी राऊत खारेपाटण कोविड केअर सेंटरचे डॉ.प्रसाद मालंडकर,स्टाफ नर्स श्रीम. ईच्छा राणे,फार्मसिस्ट मधुकर खोत आदी उपस्थित होते.
खारेपाटण येथील कोविड सेंटरला गांगेश्वर पावणाईदेवी ग्रामस्थ मंडळ नडगीवेची देणगी
