गरजुंना मदत करताना दातृत्वापेक्षा कर्तव्यभावना असावी : डॉ. सई लळीत

फोंडा कातकरी वस्तीवर ‘घुंगुरकाठी’ व ‘उर्जा’मार्फत २० कुटुंबांना पन्नास हजार रुपयांच्या जीवनावश्यक साहित्याचे वाटप

*💫ओरोस दि.२१-:* आधीच विकासापासून दूर असलेल्या आदिवासी कातकरी समाजावर कोविडनंतर तौक्ते वादळाचे संकट ओढवले आहे. समाजातील अशा गरजू घटकांना मदत करताना दातृत्वाच्या नव्हे तर कर्तव्याच्या भावनेने पुढे आले पाहिजे. समाजातील दानशूर व्यक्तींनी यासाठी स्वयंसेवी संस्थांचे हात मजबूत करावेत, असे आवाहन लेखिका व ‘घुंगुरकाठी’ सेवाभावी संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. सई लळीत यांनी आज फोंडा येथे केले. कणकवली तालुक्यातील फोंडा गांगोवाडीजवळ जंगलात राहणाऱ्या आदिवासी कातकरी वस्तीवरील २० कुटुंबांना आज ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ स्वयंसेवी संस्था आणि मुंबई येथील ‘उर्जा मुव्हमेंट’ यांच्यावतीने ५० हजार रुपये किंमतीच्या जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. कमांडर राजीव कुबल आणि मंगेश सामंत यांचा पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमावेळी डॉ. लळीत बोलत होत्या. या कार्यक्रमाला ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष सतीश लळीत, कणकवली येथील सामाजिक कार्यकर्ते व चित्रकार नामानंद मोडक, मालवण येथील सामाजिक कार्यकर्ते हरी केळुसकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page