भाजपाने छेडले कुडाळमध्ये लक्षवेध आंदोलन

तहसीलदारांना सादर केले निवेदन आरोग्य सुविधा सुधारण्याची करण्यात आली मागणी

*💫कुडाळ दि.२१-:* भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कुडाळ तहसीलदार परिसरातील कोविड सेंटर हॉस्पिटलसमोर लक्षवेध आंदोलन केले. यावेळी तात्काळ आरोग्य यंत्रणा सुधारणे गरजेचे असल्याने याची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी व उपायोजना करावी, या मागण्यांचे निवेदन भाजपने कुडाळ तहसीलदार यांना सादर केले.. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाने सध्या हैदोस माजविला आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्यावतीने ११ जून पासून जिल्ह्यात “लक्षवेध” आंदोलन राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने कुडाळ भाजपच्या वतीने कोविड सेंटर,.ग्रामीण रुग्णालय ह्या ठिकाणी भाजपने आज कुडाळात लक्षवेधी आंदोलन केले..या आंदोलनात कुडाळ पंचायत समितीच्या सभापती नुतून आईर, कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे, ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, ज्येष्ठ नेते राजू राऊळ, मोहन सावंत, ओबीसी जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, युवामोर्चा कुडाळ शहराध्यक्ष राकेश कांदे, ओरोस महिला मंडल अध्यक्षा सौ सुप्रिया वालावकर, महिला शहराध्यक्ष ममता धुरी, सोशल मीडिया जिल्हा युवामोर्चा अध्यक्ष राजवीर पाटील, तालुका उपाध्यक्ष राजा धुरी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुश्मित बांबूळकर, देवेन्द्र सामंत, चारुदत्त देसाई, युवा तालुका उपाध्यक्ष चंदन कांबळी, रेवती राणे, राकेश नेमळेकर, निलेश परब, बाळा कुडाळकर, विश्वास पांगुळ,आदी भाजप पदाधिकारी सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page