कोरोनामुळे जनता हैराण असल्याने आपला वाढदिवस साजरा करु नये

आ नितेश राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

*💫कणकवली दि.२१-:* संपूर्ण देशासह महाराष्ट्रात आणि सिंधुदुर्गात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हाहाकार उडाला होता. या लाटेत अनेक जवळच्या नातेवाइकांसह अनेक कार्यकर्त्यांना आपले प्राण गमवावे लागले असल्याने यावर्षी वाढदिवस साजरा करू नये, असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. यावेळी स्वतःची काळजी घेऊन समाजाला उपयोगी पडतील अशी कामे करा. एकमेकांना सहकार्य करा. याच मला तुमच्याकडून शुभेच्छा असतील असे भावनिक पत्र आपल्या कार्यकर्त्यांना लिहून वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page