वेंगुर्ले नगरपरिषदेतर्फे ऑनलाइन “योगदिन” साजरा

*नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्यासह 300 जणांचा ऑनलाइन सहभाग

*💫वेंगुर्ले दि.२१-:* वेंगूर्ला नगरपरिषद, वेंगूर्ला व ओम योगसाधनालय संचलित डॉ वसुधाज् योगा अँड फिटनेस अकॅडेमी यांच्या संयुक्त विद्यमाने आज वेंगुर्ला येथे सातवा आंतरराष्ट्रीय योगदिन युट्युब व फेसबुक च्या माध्यमांतून साजरा करण्यात आला. नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांच्यासह सुमारे ३०० जणांनी या योग प्रात्यक्षिकामध्ये आपल्या घरातून सहभाग घेतला. गेले दिड वर्ष आपण सर्वजण कोरोना महामारीशी लढत आहोत. कोरोना महामारीशी लढताना आधुनिक वैद्यकशास्त्र – होमिओपॅथी – आयुर्वेद याच बरोबर योगशास्त्राची अतिशय मोलाची जोड आपल्याला लाभली आहे. योगशास्त्र आपल्याला रोगप्रतिकारशक्ती शारीरिक शक्ती, मनोबल आत्मबल-भावनिक बल देत आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यावर्षी ही कोरोना च्या पार्श्वभूमीवर हा योगदिन ऑनलाईन साजरा करत असल्याचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले. डॉ वसुधाज् योगा अँड फिटनेस अकॅडेमी मार्फत डॉक्टर वसुधा मोरे यांनी योग प्रशिक्षण दिले. याचे थेट प्रक्षेपण वेंगुर्ला नगरपालिकेच्या अधिकृत युट्युब चॅनेल वरून करण्यात आले. “Be with Yoga ….. Be at Home” या संकल्पनेतून ठेवलेल्या या योगा शिबिरात आपापल्या घरी थांबून सुमारे 300 नागरिकांनी लाईव्ह भाग घेतला. नगर परिषद हॉल मध्ये सर्व नियम पाळून पार पडलेल्या या कार्यक्रमात उपनगराध्यक्ष अस्मिता राउळ, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांच्यासह नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page