भाजपा सिंधुदुर्ग च्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन अनोख्या पध्दतीने साजरा

*जिल्ह्यातील कोवीड सेंटर व ग्राम विलगीकरण कक्ष यातील कोरोना रुग्णासमोर स्क्रीन , टीव्ही , लॅपटॉप च्या माध्यमातून योगाची चित्रफीत प्रक्षेपित

*💫वेंगुर्ले दि.२१-:* भारतीय जनता पार्टी , सिंधुदुर्ग च्या वतीने जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. ओम योगसाधनालय संचालीत डाॅ.वसुधाज् योगा अॅड फिटनेस अकॅडमीच्या च्या योगगुरु डाॅ. वसुधा मोरे यांनी योगाचे धडे दिले . संपूर्ण जग गेले दीड वर्ष कोरोना या विश्वव्यापी महामारीशी लढत आहेत . कोरोना महामारीशी लढताना आधुनिक वैद्यकशास्त्र – होमिओपॅथी – आयुर्वेद याचबरोबर योगशास्त्राची अतीशय मोलाची जोड आपल्याला लाभली आहे . योगशास्त्र आपल्याला रोगप्रतीकारशक्ती – शारीरिक शक्ती , मनोबल – आत्मबल – भावनिक बल देत आहे असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी उद्घाटन प्रसंगी केले. कोवीडच्या पार्श्वभूमीवर कोरोना बाधीत रुग्ण , कोरोना मुक्त रुग्ण आणि संभाव्य तिसरी लाट यासाठी *योग प्रशिक्षण* अत्यंत गरजेचे आहे हे लक्षात घेऊन जिल्हा भाजपा च्या वतीने योगगुरु डाॅ. वसुधा मोरे यांच्या योग मार्गदर्शनाची चित्रफीत तयार करून जिल्हयातील कोवीड सेंटर ,ग्राम विलगीकरण कक्ष यातील कोरोना रुग्णासमोर प्रक्षेपित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत व आभार प्रदर्शन जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी केले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर , अभियान प्रमुख जयदेव कदम , प्रभारी सरचिटणीस प्रभाकर सावंत , प्रदेश का का सदस्य शरदजी चव्हाण , नगराध्यक्ष राजन गिरप , योग शिक्षीका डाॅ. वसुधा मोरे , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले , जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके , जि का का सदस्य सदस्य साईप्रसाद नाईक , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , नगरसेविका श्रेया मयेकर , महिला सरचिटणीस व्रुंदा गवंडळकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page