*💫कणकवली दि.२१-:* कणकवली टेंबवाडी येथील रहिवासी तथा आदर्श गेस्ट हाऊसचे मालक चिंतामणी (प्रभाकर) रघुनाथ जोशी (69) यांचे रविवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चlत दोन मुलगे, मुलगी, दोन भाऊ, वहिनी व नातवंडे असा परिवार आहे. मुंबई गोवा हायवेलगत कणकवली येथे आप्पासाहेब पटवर्धन चौकातील आदर्श गेस्ट हाऊसचे ते मालक असून रिक्षा संघटनेच्या खजिनदारपदी त्यांनी काम केले होते. तसेच जिल्हयातील पहिले परमिट प्रवासी रिक्षा चालक म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. याच बरोबर रिक्षा संघटनेच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या 21 ही दिवस सतत 30 वर्षे नैवद्य अर्पण करण्याचा मान त्यांच्याकडे होता. डिझेल व इलेक्ट्रिक पाण्याचे पंप फक्त अनुभवाच्या जोरावर ते दुरुस्त करत असल्याने जिल्ह्याभरातून लोक त्यांच्याकडे येत असत. याचबरोबर पाळीव जनावरांचे आजार व त्यासाठी द्यावयाची औषधे यातही ही ते पारंगत होते.आदर्श गेस्ट हाऊसचे चालक पराग जोशी यांचे वडील तर कणकवली नगरवाचनालयाच्या ग्रंथपाल जान्हवी जोशी यांचे ते सासरे होत.
कणकवलीतील हॉटेल व्यवसायिक चिंतामणी जोशी यांचे निधन
