त्या रुग्णवाहीका मालकालाअद्दल घडविल्याशिवाय मनसे स्वस्थ बसणार नाही:दया मेस्त्री

*💫कणकवली दि.२०-:* त्या मग्रूर रुग्णवाहीका मालकाला पाठीशी घालण्याचा प्रकार चालु असुन त्याला अद्दल घडविल्याशिवाय मनसे स्वस्थ बसणार नाही.असा इशारा मनसे सिंधुदुर्ग उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी दिला आहे.सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक यांना मी निवेदन दिलेले आहेच. मात्र त्यांच्याकडुन देखील कारवाई झाली नाहीच तर राज्य पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे दाद मागुन कारवाई करण्यास भाग पाडू.असेही दया मेस्त्री म्हणाले. कोरोना रुग्णाच्या नातेवाईक महिलेशी असभ्य वर्तन करून अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या, अवाजवी भाडे आकारून जनतेला लुटणाऱ्या रुग्णवाहिका मालकाला अद्याप अटक नाही. कोरोना रुग्णवाहिका मालकाने भाड्यावरून अर्वाच्य भाषेत एका महिलेशी वाद घातलेली क्लिप सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरलं झाली. एका महिलेशी अरेरावी करीत धमकी देणाऱ्या विरोधात सर्वस्तरावर नाराजी निर्माण झाली होती.हा इसम कोरोना काळात कित्येक दिवस अशाप्रकारे दादागिरी करून इतर रुग्णवाहिका मालकांना त्रास देण्याचा प्रकार करीत होता.कोणतंही तारतम्य न बाळगता बेसुमार भाडे आकारून कोरोना काळात जनतेची लुबाडणूक याने केलेली आहे. माझं कुणी काही वाकडं करू शकत नाही. पोलीस, आरटीओ, माझ्या खिशात आहेत.हे या इसामाचं बोलणं खरं आहे की काय..?असे जिल्ह्यातील जनतेला वाटु लागले आहे.असे दया मेस्त्री यांनी सांगितले.

You cannot copy content of this page