दळवी महाविद्यालयात 26 जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

*💫कणकवली दि.२०-:* मुंबई विद्यापीठाचे विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय आणि स्व.सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट, तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा रक्तपेढी, जि.रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन येत्या 26 जून रोजी सकाळी 9 वाजता करण्यात आले आहे. संपूर्ण जगावर घोंघावत असलेल्या कोरोनारूपी संकटामुळे रक्तदान शिबिरांना अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. दळवी महाविद्यालयात दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. सध्याची महामारीची परिस्थिती पाहता अनेक ठिकाणी रक्तदानाची गरज भासत आहे. रुग्णांना अत्यावश्‍यक असणाऱ्या रक्ताचा तुटवडा भासत असल्याने रक्तदान शिबिराच्या माध्यमातून तो दूर होवू शकतो. म्हणून दळवी महाविद्यालय आणि स्व.सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट, तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा रक्तपेढी, जि.रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रशासन व सरकारच्या नियमांचे पालन करीत विशेष काळजी घेत हे शिबीर घेण्यात येणार आहे. वाचकांनी त्यांच्या संपर्कातील रक्तदात्यांना या उपक्रमासंदर्भात माहिती द्यावी व जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page