*💫मालवण दि.१९-:* शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त कुडाळ येथे पेट्रोल पंपवर आमदार वैभव नाईक यांच्यावतीने आयोजित स्वस्तात पेट्रोल वाटप कार्यक्रमावेळी भाजप शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याच्या पार्श्वभूमीवर मालवण पोलिसांनी याचे गांभीर्य ओळखून मालवण येथील पेट्रोल पंप वर बंदोबस्त ठेवला आहे. कुडाळ मध्ये भाजप शिवसेनेत राडा झाल्याने राजकीय दृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या मालवणात याचे पडसाद उमटू नये तसेच कायदा सुव्यवस्था सुरळीत राहावी यादृष्टीने मालवण पोलिसांनी तातडीने मालवण शहरात आपली नजर ठेवत पेट्रोल पंपाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी पेट्रोल पंप येथे तैनात करण्यात आले होते.
कुडाळातील शिवसेना भाजपा राड्याच्या पार्श्वभूमीवर मालवणात पोलिसांचा बंदोबस्त
