नगरसेविका दीपाली भालेकर व इतर नगरसेवक होते उपस्थित
*💫सावंतवाडी दि.१९-:* सावंतवाडी नगरपालिकेच्या वतीने प्रभाग नुसार सुरू करण्यात आलेल्या रॅपिड टेस्ट आज शहरातील प्रभाग १ आणि ३ मधील नागरिकांसाठी वैश्य भवन गवळी तिठा येथे आयोजित करण्यात आली आहे. या रॅपिड टेस्ट साठी येथील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. यावेळी नगरसेविका दिपाली भालेकर, नगरसेविका शुभांगी सुकी, डॉ. उमेश मसुरकर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर, डॉ. सुप्रिया धाकोरकर, दिनेश भोसले, नागेश बिद्रे, दत्तात्रय पंडित, शुभम गवळी, गणेश खोरागडे आदी उपस्थित होते.
