‘कोकणातील फलोत्पादनाच्या संधी’ विषयावर २० जून रोजी कणकवली कॉलेजमध्ये व्याख्यान

*💫कणकवली दि.१८-:* येथील माजी आमदार तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक चेअरमन,शिक्षण महर्षी कै.केशवराव व्यंकटेश राणे यांच्या ११ व्या पुण्यतिथी निमित्त सामाजिक विज्ञान मंडळ, कणकवली कॉलेज कणकवली यांच्या वतीने आँनलाईन फेसबुक व्याख्यान आयोजित केले आहे. रविवार दिनांक २० जून रोजी सकाळी १०.०० वाजता कणकवली महाविद्यालयात कै.केशवराव राणे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सभा होणार असून याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.भाईसाहेब खोत, चेअरमन मा.पी.डी.कामत, सचिव विजयकुमार वळंजू, शिक्षण उपस्थित राहणार आहेत.तसेच १०.३० वाजता दापोली येथील फलोत्पादन महाविद्यालयातील ज्येष्ठ अभ्यासक प्रा.महेश कुलकर्णी यांचे ‘कोकणातील फलोत्पादनाच्या संधी’ या विषयावर व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.राजेंद्रकुमार चौगुले उपस्थित राहणार आहेत. हे व्याख्यान कणकवली कॉलेज, कणकवलीच्या अधिकॢत‌ फेसबुक पेजवर लाईव्ह होणार असून जिल्ह्यातील शिक्षणप्रेमी, शेतकरी, बागायतदार, कार्यकर्ते, विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.संभाजी पाटील, डॉ.राजेंद्र मुंबरकर ,प्रा.युवराज महालिंगे, डॉ. सोमनाथ कदम, डॉ.बाळू राठोड यांनी केले आहे.

You cannot copy content of this page