किर्लोस फाटा येथील अपघातातील मारुती व्हॅन काढली बाहेर
*💫कणकवली दि.१५-:* केवळ सामाजिक कार्यकर्ता ही ओळख असून चालत नाही तर सामाजिक काम करावे लागते आणि अडचणीच्या वेळेला कोण मदतीला येऊ शकतो हा विश्वास कमवावा लागतो याचीच प्रचिती किर्लोस गावचे सुपुत्र तथा शिवसेना मालवण उपतालुकाप्रमुख प्रशांत उर्फ बाबा सावंत यांनी दिली आहे .किर्लोस फाटा येथील अवघड वळणावर एका मारुती व्हॅनला अपघात झाला आणि ही मारुती व्हॅन रस्त्याच्या बाजूला कलंडली.याबाबतची माहिती मिळाल्यानंतर बाबा सावंत यांनी स्वतःचा जेसीबी लावत सदर मारुती व्हॅन बाहेर काढत मदतीचा आधार आधार दिला. मालवण तालुक्यातील किर्लोस फाटा येथील एका अवघड वळणावर किर्लोस येथे जाणारी मारुती व्हॅन रस्ता सोडून कलंडली. या व्हॅनमध्ये मोठ्यांसह लहान मुलांचाही समावेश होता. सर्वात प्रथम महान मधील सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले त्यानंतर बाबा सावंत यांनी स्वतःचा जेसीबी आणत व्हॅन सुखरूपरित्या बाहेर काढली. यापूर्वीही बाबा सावंत यांनी अशाप्रकारे अनेकांना मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे बाबा सावंत यांच्यातील सामाजिक कार्यकर्ता या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आला.
