इंधन दरवाढीविरोधात सावंतवाडीत धक्का मारो आंदोलन

बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी व महिला आघाडीचा पुढाकार; तहसीलदार यांना दिले निवेदन

*💫सावंतवाडी दि.१५-:* बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी आणि महिला आघाडी तर्फे आज सावंतवाडी शहरात गवळी तिठा ते तहसीलदार कार्यालय पर्यंत गाड्यांना धक्का मारत ” धक्का मारो आंदोलन ” बहुजन मुक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस आणि राज्य सरकारने खाद्य तेल, वीजबिलात केलेली भरमसाठ वाढ यामुळे सर्वसामान्य गरीब माणूस मेठाकुठीला आला असून, जगण्यासाठी संघर्ष करत आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज सावंतवाडी तालुक्यात हा महागाईचा निषेध करण्यासाठी धक्का मारो आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी बहुजन मुक्ती पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी आणि महिला आघाडी तर्फे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना महागाई कमी करण्यासाठी विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. यावेळी बहुजन मुक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष लाडू जाधव, संकेत कुडाळकर, सगुण जाधव, प्रकाश जाधव , प्रतिक जाधव, अनिकेत जाधव, तुषार कदम, संजय जाधव आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page