कणकवली पोलिसांची गोवा बनावट दारू विरोधात धडक कारवाई

ओसरगांव येथे दोन लाख ६४ हजाराची पकडली दारू साडे दहा लाखांवर पकडला मुद्देमाल

*💫कणकवली दि.१५-:* गोव्याहून मुंबईच्या दिशेने होणारी गोवा बनावटीच्या 2 लाख 64 हजार रुपयांच्या दारुसह 8 लाखाचा ट्रक असा एकूण 10 लाख 64 हजारांचा मुद्देमाल कणकवली पोलिसांनी जप्त केला आहे. नॅशनल हायवेवर ओसरगाव टोलनाक्याजवळ 14 जून रोजी रात्री 7 वाजून 30 मिनिटांनी ही कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी 2 युवकांना ताब्यात घेण्यात आले आहे. गोवा बनावटीची दारू वाहतूक होणार असल्याची टीप कणकवली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ओसरगाव हायवे टोलनाका येथे कणकवली पोलिसांचे पथक टेहळणी करत होते. संशयित ट्रक क्र. MH -04 – EY – 4567 टोलनाक्यावर आला असताना पाहणी केली असता हौद्यात 200 बॉक्समध्ये गोवा बनावटीची 2 लाख 64 हजार किंमतीची दारू आढळून आली. या अवैध दारू वाहतुकप्रकरणी संतोष विठ्ठल शिंगाडे ( वय 35, रा. रानबांबुळी, ता कुडाळ ) आणि अनस इब्राहिम चेअरडीएल वय 37 , सध्या रा. भटवाडी फेडरल बँक समोर सावंतवाडी , मूळ रा. वेलानागल्लूर जि.त्रिशूर, केरळ ) या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस कॉन्स्टेबल वैभव कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा कलम 65 (अ ), ( ई ), 81,83 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, पोलीस कॉन्स्टेबल रुपेश गुरव यांनी केली. पुढील तपास एपीआय सागर खंडागळे करत आहेत.

You cannot copy content of this page