ग्रामस्थानी केले झाडाचे रोपटे देऊन स्वागत
*💫कणकवली दि.१५-:* खारेपाटण येथे लोकसहभागातून स्थानिक ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने निर्माण केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांपैकी पहिल्या बरा होऊन बाहेर आलेल्या रुग्णाचे खारेपाटण ग्रामस्थांच्यावतीने एक झाडाचे रोपटे तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. खारेपाटण रामेश्वरनगर येथे २५ बेडचे सुसूज्ज कोविड केअर सेंटर काही दिवसांपूर्वी सुरु करण्यात आले होते. खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे कोविड सेंटर उभारणीत मोठा हातभार लावला होता. या कोविड केअर सेंटरमध्ये१४ कोविड बाधित रुग्ण दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खारेपाटण कोविड सेंटरमधून बरा होऊन पहिला रुग्ण बाहेर आल्यानंतर त्याचे स्वागत करून त्याला ग्रामस्थ व डॉक्टर यांच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते महेश कोळसुलकर, संकेत शेट्ये,डॉ.प्रसाद मालंडकर,डॉ.बलराज येळकोटे,स्टाफ नर्स श्रीम. तांबे आदी उपस्थित होते.
