मळेवाड विलगिकरण मधील रुग्णाना अंडी वाटप

राज ठाकरेंच्या वाढदिनी मनसेचा उपक्रम

*💫सावंतवाडी ता.दि.१५-:* मळेवाड येथील गाव विलगिकरण कक्षाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रूग्णांना अंडी वाटप करण्यात आली.मळेवाड जकातनाका येथील राणी पार्वती देवी विद्यालय मळेवाड केंद्र शाळा नंबर 1 मध्ये ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडून गावातील कोरोना बाधित रुग्णांसाठी गाव विलगिकरण कक्ष सुरू केला.आहे. सर्व सोयींनी युक्त असा हा कक्ष असल्याने दाखल रूग्णांना चांगली सेवा मिळत आहे.मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या कक्षातील रूग्णांना मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडुन अंडी देण्यात आली आहे. रूग्णांची पौष्ठीकता वाढावी यासाठी अंडी दिल्याबद्दल सरपंच हेमंत मराठे यांनी मनसे चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानले आहेत.यावेळी गाव कृषि मित्र अमित नाईक,मनसे जिल्हा अध्यक्ष धीरज परब,परिवाहन सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बनी नाडकर्णी, सावंतवाडी तालुका अध्यक्ष गुरूदास गवंडे, मळेवाड मतदारसंघ विभाग अध्यक्ष मंदार नाईक आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page