जुलैमध्ये तरी आंबोली धबधबा सुरु करावा;नागरिकांची मागणी
*💫आंबोली दि.१५-:* कोरोनामुळे सलग दोन वर्ष आंबोलीतील पर्यटन बंद असल्याने हॉटेल व्यवसाय देखील बंद आहेत. त्यामुळे तेथील व्यवसायिकांसह या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या मजुरांचे देखील हाल होत असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हॉटेल व्यवसाय बंद असल्याने हॉटेल व्यवसायिकांनी घेतलेल्या बँकाच्या कर्जाची परतफेड कशी करावी त्याचे हफ्ते कसे फेडावे या विवंचनेत ते व्यवसायिक आहेत. यापुढे देखील आंबोलीत अशीच परिस्थितीत राहिली तर खूप कठीण परिस्थितीत निर्माण होण्याची शक्यता व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे निदान जुलै मध्ये तरी पर्यटन व्यवसाय गावपातळीवर सुरू ठेवावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
