नाणोस गावात ४५ वर्षांवरील नागरिकांची लसीकरण मोहिम संपन्न…

प्राथमिक आरोग्य केंद्र मळेवाड, ग्रामपंचायत नाणोस, कोकण फार्मास्युटिकल नाणोस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

*💫वेंगुर्ले दि.१४-:*   नाणोस गावात ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र मळेवाड यांच्या सहकार्याने, ग्रामपंचायत नाणोस आणि कोकण फार्मास्युटिकल नाणोस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाणोस गावात लसी करण मोहिम आज संपन्न झाली.

नाणोस, तिरोडा गावातील ४५ वर्षावरील बहुतांश नागरीकांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण घेऊन सकारात्मक प्रतिसाद दर्शविला नाणोस, तिरोडा गावातील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने लसीकरणाचा लाभ घेतला. या लसिकरणाचे औपचारिक उद्घाटन आरोग्य सेवक  सुशांत कामत, माजी सरपंच  सोमकांत नाणोसकर, ग्रामसेवक  ज्ञानेश करंगुटकर, नाणोस सरपंच  वासुदेव जोशी, उपसरपंच  संजय नाणोसकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख  सागर नाणोसकर, पोलिस पाटील  लवू रगजी, परीचारीका  अमिता आरोलकर, आरोग्य सेविका जोस्ना नवार, आरोग्य सेविका सिमाली गवाणकर, आशाताईं उर्मिला तळकर, सदस्य विद्या नाणोसकर,  रसिका जोशी आदि मान्यवर आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत नानोस येथे संपन्न झाले.

You cannot copy content of this page