मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५३ वा वाढदिवस सावंतवाडी शहर मनसेकडून साजरा

वाढदिवसानिमित्त ५३ वृक्ष रोपण व ५३ वृक्ष वाटप

*💫सावंतवाडी दि.१४-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५३ वा वाढदिवस आज सावंतवाडी मनसेच्यावतीने साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी शहर मनसेकडून ५३ वृक्ष रोपण व ५३ वृक्ष वाटप करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, उपशहराध्यक्ष शुभम सावंत, विद्यार्थीसेना तालुकाध्यक्ष ओमकार कुडतरकर, युवती तालुकाध्यक्षा ललिता नाईक, उपाध्यक्ष देवेंद्र कदम, गोविंद सोनी, अनुप सोनी आदी उपस्थित होते. कोरोना नियमावलीचे पालन करून हा कार्यक्रम पार पडला.

You cannot copy content of this page