उदय सामंत नावाचेच पालकमंत्री

खासदार, आमदारांना जनतेचे देणे-घेणे नाही;सावंतवाडी येथे नारायण राणेंचे टिकास्त्र

*💫सावंतवाडी दि.१४-:* जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, मृत्यू दरही वाढत आहे. परंतु असे असताना देखील जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार आणि आमदार काय करत आहेत? असा सवाल माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार नारायण राणे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. आज कोलगाव येथील ग्राम विलगी करण कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी त्यानी पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, सिव्हील डॉक्टर्स, नर्स, वॉर्ड बॉय रुग्णालयात पुरेश्या प्रमाणात उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे कोरोना पेशंटवर सद्य स्थितीत दाताचे, स्किन चे डॉक्टर उपचार करत आहेत. याची राज्य सरकार आणि पालकमंत्र्यांना लाज वाटत नाही का? अशी जोरदार टीका खा. राणे यांनी केली आहे. उदय सामंत हे नुसते नवाचेच पालकमंत्री असून, खासदार आणि आमदारांना जनतेचे देणे घेणे नसल्यामुळे ते दुर्लक्ष करत असल्याची जोरदार टीकास्त्र त्यानी यावेळी सोडले आहे. यावेळी ते म्हणाले की, आपण स्वतः याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेणार असून, जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी जातीनिशी लक्ष घालणार असल्याचे आश्वासन खा. नारायण राणे यांनी यावेळी दिले आहे.

You cannot copy content of this page