खारेपाटण कोविड सेंटरला जैन समाज बांधवांकडून पाणी बॉटल व बिस्कीट वाटप

*💫कणकवली दि.१४-:* खारेपाटण येथे लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या २५ बेडच्या कोविड केअर सेंटरला खारेपाटण येथील जैन समाज बांधवांकडून पाणी बॉटल बॉक्स व बिस्कीट पुढे येथील कर्मचारी वर्गाकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी खारेपाटण जैन समाज बांधव मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र ब्रम्हदंडे, महावीर ब्रम्हदंडे, शीतल कावळे,निरंजन चव्हाण ,सुयोग ब्रम्हदंडे, आदी जैन समाज बांधव उपस्थित होते. यावेळी जैन समाजाच्या वतीने येथील कोविड सेंटर मध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना पाणी बॉटल व बिस्कीट बॉक्स कोविड सेंटरचे डॉ.सुजित कदम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या कोव्हीड सेंटरचे उदघाटन कणकवली तालुक्याच्या प्रांत अधिकारी वैशाली राजमाने यांच्या हस्ते होऊन कोव्हीड बाधित रुग्णासाठी खुले करण्यात आले आहे. खारेपाटण रामेश्वर नगर येथे उभरण्यात आलेल्या या कोविड सेंटर साठी खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत यांचा मोलाचा वाटा असून त्यांचे सहकारी रफिक नाईक,महेश कोळसुलकर,संकेत शेट्ये आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील त्यांना मोलाचे सहकार्य केले आहे. खारेपाटण येथील जैन समज यांच्या वतीने कोविड सेंटरला 1200 पाणी बॉटल तसेच बिस्कीट पुढे सुपूर्द करण्यात आले.

You cannot copy content of this page