गिरणी कामगारांना वडाळा-मुंबईत सात हजार घरे मिळणार :प्रकाश नाईक

*💫कणकवली दि.१४-:* सम्राट अशोक टुरीझमच्या सहकार्याने गिरणी कामगारांना मुंबईतील शिवडी-वडाळा येथे माफक किमंतीत सात हजार घरे लवकरच उपलब्ध होणार आहेत. गिरणी कामगारांसह शासकीय कर्मचारी आणि झोपडपट्टीधारकांनाही घरे उपलब्ध होणार आहेत. एमएमआरडीने अलिकडेच ३० एकर जमीनीचा ताबा दिला आहे, अशी माहिती गिरणी कामगार वारस उत्कर्ष सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश नाईक यांनी दिली. संघाच्या मुंबईतील करीरोड येथील कार्यालयात झालेल्या बैठकीत श्री नाईक यांनी ही माहिती दिली. या बैठकीत शिवसंग्रामचे मुंबई सरचिटणीस हिंदुराव जाधव, रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विलास तायडे, कार्यालय प्रमुख बापू बागडी आदी उपस्थित होते. या संदर्भात अधिक माहिती देताना नाईक यांनी म्हाडाकडे सुमारे पावणेदोन लाख गिरणी कामगार आणि वारसांनी अर्ज भरले आहेत. पैकी शासनाने अवघी बारा हजारच घरे उपलब्ध केली आहेत. उर्वरितांना मुंबई बाहेर पेण-पनवेल परिसरात घरे उपलब्ध करण्याचे गाजर दाखवले आहे, अशी टीका करून त्यांनी एवढी लांब घरे घेण्यास बहुसंख्य कामगार उत्सुक नाहीत. त्यामुळेच आम्ही मुंबईत घरे उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात होतो. दरम्यान महाराष्ट्र भूषण पर्यटन पुरस्कार प्राप्त, तसेच गिरणी कामगाराचे वारस असलेले सम्राट अशोक टुरिझम अँण्ड इंफ्रास्ट्रक्चरचे अध्यक्ष अशोक बाळाराम कदम यांनी गिरणी कामगारांच्या घरांच्या व्यथा जाणून या कामी पुढाकार घेतला. त्यांनी आमच्या संघामध्ये सहयोगी होऊन घरांसाठी केंद्र आणि राज्य शासनांकडून जमीन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरु केले, अशी माहिती देऊन ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरातील स्मारकामुळे मुंबईतील कुलाबा कफ परेड येथील झोपटपट्टी बांधित होत आहे. कदम यांनी शासनाच्या धोरणानुसार स्वच्छ भारत अभियान, झोपडी मुक्त अभियानांतर्गत या झोपडपट्टीच्या पुनर्वसनासह गिरणी कामगारांना आणि शासकीय कर्मचाऱ्याना हक्काची घरे माफक किमंतीत उपलब्ध करुन देण्यासाठी एमएमआरडीच्या वडाळा-शिवडी येथील भक्ती पार्क नजिकच्या तीस एकर भुखंडाची मागणी करणारा प्रस्ताव तयार केला. त्यासाठी त्यांनी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री, संबधीत खात्याचे मंत्री आदींच्या भेटीगाठी घेऊन हा प्रस्ताव सादर करून मान्य करून घेतला आहे. अलिकडेच एमएमआरडीने या ३० एकर भुखंडाचा ताबा सम्राट अशोक टुरिझमकडे हस्तांतरित केला आहे. २० एप्रिल रोजी अधिकारांच्या उपस्थित सम्राट टुरिझम, सेवा संघाच्या पदाधिकार्यांसह या जमीनीची हद्द कायम करण्यात आली, अशी माहिती देऊन नाईक यांनी या आमच्या योजनेतंर्गत कामगार अथवा वारसांना माफक किमंतीत ३५५ चौ. फुटाची ७००० घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या घरांसाठी कायदेशीर मार्गाने अर्ज स्विकारण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. इच्छुकांनी आपापल्या भागातील संघटकांकडून योग्य माहिती घेऊन पुराव्यासह सर्वं कागदपत्रांसह मुंबईतील सेवा संघाच्या कार्यालयात त्वरित अर्ज भरावेत, असे आवाहन केले आहे. मुंबईत ७९७७४४९७८८ तर कोकणसाठी ९४२२३८१९९३ यावर संपर्क करावा. असे आवाहन केले. .

You cannot copy content of this page