कॉंग्रेस ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी बुधवारी जिल्ह्यात

जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडेंची माहिती

*💫सावंतवाडी दि.१३-:* महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष श्री.भानुदास माळी हे बुधवारी १६ जून रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दुपारी ३.३० वाजता एमआयडीसी रेस्ट हाऊस कुडाळ येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. श्री. माळी यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेशचे पदाधिकारी सुद्धा येणार आहेत, अशी माहिती सिंधुदुर्ग काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांनी दिली आहे.तसेच या बैठकीस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील उपस्थित राहण्याचे गावडे यांनी आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page