शेतीच्या कामाना वेग
*💫देवगड दि.१३-:* देवगड तालुक्यात गेले दोन दिवस पावसाची संततधार असून यामुळे बळीराजा सुखावला आहे.मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३ जुनपर्यंत मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता त्याप्रमाणे शनिवारपासून पावसाने जोरदार धडाका लावला आहे. रविवारी सकाळपासून पावसाने जोरदार बॅटींग सुरू केली.थोडावेळ विश्रांती व पुन्हा फटकेबाजी यामुळे वाहतुक सेवेवरही थोडासा परिणाम झाला.तालुक्यात रविवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार ५४ मिमी पावसाची नोंद झाली.मात्र या पावसामुळे कोणतीही मोठी हानी व नुकसानी झाली नाही. पावसाळा सुरू झाल्याने शेतीच्या कामांनाही वेग आला आहे.
