दबक्या आवाजात कशाला करता चर्चा, उघड चर्चा करा

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा टोला;तर आत्तापर्यंत का कारवाई केली नाही?

*💫कणकवली दि.१४-:* दबक्या आवाजात कशाला करता चर्चा, उघड चर्चा करा, आम्हीच जिल्हाधीकाऱ्यांकडे तक्रार केली त्यानंतरच कारवाईला सुरुवात झाली. तक्रार मागे घेण्याची विनंती करण्यासाठी कोणी भेटण्यासाठी आलेही असतील तर लेखीस्वरुपात केलेली तक्रार मागे घेतली का जाहीर करा. असे आवाहन मनसे सरचिटणीस तथा माजी आम. परशुराम उपरकर यांनी कणकवलीतील प्रसिद्ध डॉक्टरांनी घेतलेल्या भेटी संदर्भात म्हटले आहे. माजी आम.परशुराम उपरकर म्हणतात,सत्ताधारी म्हणून तुम्हाला या खाजगी डॉक्टरांकडून होणारी लूट मान्य आहे तर तुमचे आमदार ,खासदार आणि पालकमंत्री यांनी आत्तापर्यंत का कारवाई केली नाही असाही प्रश्न उपरकर यांनी सत्ताधाऱ्यांना विचारत जर कोणी कोणाला भेटण्यामध्ये तडजोडीचा संशय असेल तर जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील ठेकेदार कायमच तळगावच्या वाटेने खासदारांच्या बंगल्यावर का धावतात.कुडाळ भंगसाळ नदी निकृष्ट बंधारा ज्याची तक्रार खुद्द शिवसेच्याच कुडाळ तालुक्यातील माजी लोकप्रतिनिधींनेच केली होती तसेच लाखो रूपये बुडवून आंब्रड येथील अर्धवट राहिलेले धरणाचे काम या दोन्ही कामाचा ठेकेदार आमच्या आमदारांना का सारखा- सारखा भेटत असे आणि त्याला पाठीशी कोणी घातल तसेच ओरोस मधल्या प्रेत जाळण्यासाठीच्या ठेकेदाराचा पार्टनर कोण लोकप्रतिनिधी. त्या ठेकेदाराला फॉरेस्टकडून कोणत्या लोकं प्रतिनिधींनी मोफत लाकडे मिळवून दिली, सदर ठेका कोणी मिळवून दिला,सदर ठेकेदार कोणत्या पक्षाचा विभागप्रमुख तेही जाहीर करावे असेही उपरकर यांनी म्हटले आहे या पोस्टसाठी, मनसेची भूमिका जोपर्यंत डॉक्टरांनी जनतेचे जादा घेतलेले पैसे परत नाही करत तोपर्यंत मनसे आंदोलन करत बसणार आहे या आंदोलनाची लाज सत्ताधाऱ्यांना वाटली पाहिजे ज्या जनतेने निवडून दिले त्या जनतेला लुटणार्‍या डॉक्टरांची बाजू घेतात आणि त्यांना गावातील महनीय व्यक्तींचे गावांसाठी उभारलेले रूग्णालय स्वता:च्या स्वार्थासाठी भागीदारीत चालवायला देतात. असा गंभीर आरोप मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे

You cannot copy content of this page