सेवानिवृत्त मुख्याध्यापक शांताराम सावंत यांचे निधन…

*💫कणकवली दि.१३-:* भिरवंडे-मुरडवेवाडीतील रहिवाशी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक शांताराम रावजी सावंत (91) यांचे रविवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. भिरवंडे गावाच्या सामाजिक, शैक्षणिक ,सांस्कृतिक उपक्रमात ते अग्रेसर असत. अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे ते शालेय समिती सदस्य होते. जुन्या पिढीतील मनमिळावू, मार्गदर्शक व्यक्तिमत्व त्यांच्या जाण्याने काळाच्या पडद्याआड गेले आहे.त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.

You cannot copy content of this page