तहसीलदार अजय पाटणे यांचे आवाहन
*💫मालवण दि.११-:* बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने येत्या दोन दिवसात जिल्ह्यात जोरदार वारे व अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असल्याने मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीकरिता जाऊ नये, तसेच नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांनी केले आहे. दि. ११, १२ व १३ जून रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पाऊस पडण्याची, वीज चमकण्याची तसेच वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. समुद्र खवळलेला राहणार असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये. तसेच सर्व नागरिकांनी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार अजय पाटणे यांनी केले आहे.
