खा राऊत यांचे रूपेश राऊळ यांना आश्वासन
*💫सावंतवाडी दि.११-:* खरीप हंगामा करीता शेतकऱ्यांना लागणारे खत लवकरात लवकर कृषी सेवा केंद्रांना पुरविण्यात येईल असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांना दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या. संस्थेने संपूर्णा आणि समर्थ या मिश्र खताची मागणी मे. झुआरी कंपनीकडे दिली होती. परंतु सदर कंपनीकडून आवश्यक खताचा पुरवठा करण्यात आला नव्हता. त्यामुळे अनेक शेतकरी खतांपासून वंचित होते. त्यामुळे सुरळीत खत पुरवठा करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी संस्थेचे व्हा. चेअरमन अरुण गावडे यांनी पत्रकाद्वारे खासदार विनायक राऊत यांच्या कडे केली होती. यावेळी आज खासदार विनायक राऊत यांनी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांना हा खत पुरवठा सुरळीत केला जाईल असे आश्वासन दिले आहे.
