*💫बांदा दि.११-:* गावातील विकासकामे ग्रामस्थांच्या योगदानाशिवाय होत नसतात. प्रत्येक ग्रामस्थ आपल्यापरीने योगदान देत असतो पण तो त्याची प्रसिद्धी करत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सैनिक हा प्रसिद्धीचा भुकेलेला नसल्यामुळे तो प्रसिद्धीसाठी स्टेटमेंट कधीही देत नाही. आरोस सरपंचांना कुठच्या प्रकारचे योगदान अपेक्षित आहे? तसेच केवळ विरोधासाठी विरोध न करता सत्यता पडताळा, असा प्रतिटोला मनसे विभागप्रमुख मंदार नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आरोस सरपंच शंकर नाईक यांना लगावला. ‘स्टेटमेंट न करता गावासाठी योगदान द्या’ असे आवाहन सरपंच शंकर नाईक यांनी मनसे विभागप्रमुख मंदार नाईक यांना केले होते. मंदार नाईक म्हणाले की, बीएसएनएलच्या ज्या तक्रारी असतात त्या ग्रामपंचायत कार्यालयात दिल्या जात नाहीत तर संबंधित कार्यालयात दिल्या जातात किंवा कर्मचाऱ्यांना सांगून ग्राहक स्वतः सोडवून घेतात. तसेच आरोस गावात बीएसएनएलची किती कनेक्शन चालू व किती बंद आहेत याची मोजणी करत बसण्यापेक्षा जी कनेक्शन चालू आहेत त्यांना योग्य सेवा कशी मिळेल या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. आम्ही स्वतः सेवा वापरतो त्यामुळे ही सेवा कशी मिळते हे आम्हाला माहीत आहे. केवळ विरोधासाठी विरोध न करता त्या बाबतीत शहानिशा करून मग स्टेटमेंट द्यावे, असा सल्ला मंदार नाईक यांनी दिला.
ग्रामस्थांच्या योगदानामुळेच विकासकामे शक्य : मंदार नाईक
