कणकवली तहसीलदार रमेश पवार यांचे आवाहन
*💫कणकवली दि.०९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात 10 ते 12 जून या कालावधीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांचे पाणी वाढण्याची शक्यता आहे तसेच अन्य हानी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी तसेच आपत्कालीन परिस्थितीत 02367-232025 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार रमेश पवार यांनी केले आहे. कणकवली तालुक्यातील सर्व नागरिकांना तहसीलदार रमेश पवार यांनी आवाहन केले आहे ते म्हणतात, या कालावधीत अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे. मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांचे पाणी वाढण्याची शक्यता आहे, अशा वेळी नदी-नाले ओलांडून जाताना काळजी घ्यावी. रस्त्यांवर अथवा मोऱ्यांवर पाणी आलेले असताना वाहने चालवू नयेत. कुठेही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा. या कालावधीत मुसळधार पावसासह गडगडाट झाल्यास विद्युत उपकरणे बंद ठेवावीत. दूरध्वनी भ्रमणध्वनीचा वापर शक्यतो टाळावा. घराबाहेर असलेल्यांनी विजेच्या खांबा खाली राहू नये किंवा उंच झाडाखाली आश्रय घेऊ नये. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. तसेच आपत्कालीन परिस्थितीत 02367-232025 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार रमेश पवार यांनी केले आहे.
