सावंतवाडी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी
सावंतवाडी – सावंतवाडी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि मालवण या मोठ्या शहरांसाठी तेथील नगरपरिषदेकडे दोन रुग्णवाहिका द्याव्यात तसेच दोडामार्ग, कुडाळ, देवगड, वैभववाडी या नगरपालिकेकडे प्रत्येकी एक रुग्णवाहिका देण्यात यावी अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. साळगावकर यांनी पालकमंत्री श्री सामंत यांच्याकडे केलेल्या मागणीमध्ये, जिल्ह्यातील मोठ्या शहरांमध्ये 35 ते 40 हजाराच्या पटीत लोकसंख्या आहे सद्यस्थितीत कोरोनाच्या संकट काळात रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये ॲम्बुलन्स मिळवताना हे सुद्धा अनेक प्रयत्न करावे लागत आहेत, त्याच्या शहरांमध्ये रुग्णांना तात्काळ ॲम्बुलन्स उपलब्ध होण्यासाठी गांभीर्याने विचार करावा, यामध्ये सावंतवाडी वेंगुर्ला आणि मालवण नगर परिषदेसाठी दोन ॲम्बुलन्स तर दोडामार्ग, कुडाळ, देवगड, वैभववाडी या नगरपंचायतकडे प्रत्येकी एक ॲम्बुलन्स उपलब्ध करून द्यावी. तसेच जिल्ह्याच्या तिन्ही आमदाराने या ॲम्बुलन्स मिळण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करावेत असे मागणीही श्री साळगावकर यांनी केली आहे.
