बांदा खून प्रकरणी मुख्य संशयिताला नऊ दिवसांची पोलीस कोठडी

बांदा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

*💫बांदा दि.०९-:* बांदा-गडगेवाडी येथील परप्रांतीय कामगार विश्वजीत मंडल याच्या खून प्रकरणी बांदा पोलीसांनी मुख्य संशयिताच्या उल्हासनगर येथे मुसक्या आवळल्या. सुखदेव सोपान बारीक (२७, मूळ रा. पश्चिम बंगाल, सध्या रा. उल्हासनगर) असे त्याचे नाव आहे. मोबाईल लोकेशनवरुन मंगळवारी रात्री पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. सावंतवाडी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. बांदा – गडगेवाडी येथे भाड्याने खोली घेऊन राहत असलेल्या विश्वजित मंडल या परप्रांतीय कामगाराचा खून करण्यात आला होता. मयताची पत्नी, मुलांचे जबाब यावरुन बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी तपासाची चक्रे फिरविली होती. संशयिताच्या मोबाईल लोकेशनवरुन पोलीसांचे पथक तपासासाठी मुंबईत पोहोचले होते.

You cannot copy content of this page