धनश्री गवस यांचा कार्यकारी अभियंताना इशारा
*💫बांदा दि.०९-:* लघु पाटबंधारे विभागाच्या वाफोली येथील तलावाच्या बुडीत क्षेत्रातील मोकळ्या जागेत लगतच्या क्वारी व्यावसायिकांनी बेकायदा मातीचे ढिगारे व दगड टाकले आहेत. याचा परिणाम पावसाळ्यात धरणातील पाणी साठ्यावर होणार आहे. ही माती पावसाच्या पाण्याबरोबर धरणातील जलाशयात येऊन साचणार असल्याने याचा परिणाम भविष्यात शेतकऱ्यांच्या सिंचनावर होणार आहे. त्यामुळे आपण याबाबत तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी श्री देवी माऊली पाणी वापर संस्थेच्या अध्यक्षा धनश्री गवस यांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कारवाई न केल्यास प्रसंगी जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा सौ. गवस यांनी निवेदनात दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, धरणातील पाणीसाठ्यावर परिणाम झाल्यास याचा परिणाम भविष्यात सिंचनावर होणार आहे. त्यामुळे आपण लवकरात लवकर पाहणी करून धरणातील जलाशयात टाकण्यात आलेल्या मातीची व धरणालगत सुरू असलेल्या क्वारींवर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
