*💫मालवण दि.०८-:* ग्रामस्तरावर दिवसेंदिवस कोविड संक्रमण वाढताना दिसत आहे. तारकर्ली गावातही कोरोनाचा संसर्ग वाढल्याने त्याला आळा घालण्यासाठी तारकर्ली प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे सर्व कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. हे कार्य करत असताना कर्मचाऱ्यांना सहकार्य म्हणून दर्यावर्दी कला-क्रिडा मंडळाने तारकर्ली प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला ४ पल्स ऑक्सीमीटर उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन अडचणी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. याबाबत कर्मचाऱ्यांनी मंडळाचे आभार मानले.
तारकर्ली प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला ४ पल्स ऑक्सीमीटर प्रदान
