भिरवंडे तलाठी यांचा सतीश सावंत यांनी केला सत्कार

अवघ्या चार दिवसात 5 गावांचे पंचनामे करून प्रस्ताव तहसीलदाराना सादर

*💫कणकवली दि.०८-:* भिरवंडेसह पाच महसुली गावातील शेतकऱ्यांचे चक्रीवादळात मोठे नुकसान झाले होते. गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्याना शासन भरपाई मिळावी म्हणून तलाठी समृध्दी गवस यांनी परिश्रम घेतले. अवघ्या चार दिवसात पाचही महसुली गावातील पंचनामे पुर्ण करण्यात आले. जवळपास १५० पेक्षा अधिक कुटुंबांच्या घरांचे नुकसान झाले होते. चक्रीवादळानंतर अवघ्या चार दिवसांमध्ये तलाठी आणि त्यांच्या पथकाने पाचही महसुली गावातील पंचनामे करून आपला प्रस्ताव तहसीलदारांना पाठवल्याबद्दल जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत यांच्या हस्ते तलाठी समृद्धी गवस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे सदस्य मंगेश सावंत, गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे, उपसरपंच राजेंद्र सावंत, माजी उपसरपंच विजय सावंत, प्रकाश सावंत आदीमान्यवर उपस्थितीत होते.

You cannot copy content of this page