हवामान खात्याचा अंदाज
*💫सिंधुदुर्गनगरी दि.०७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक १० व ११ जुन रोजी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभाग मुंबईने वर्तवला असून, नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष , जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
