*💫वेंगुर्ला दि.०७-:* सिंधुदुर्ग जिल्हा सद्यस्थितीत कोरोना प्रदूर्भावाच्या वाढत्या प्रभावामुळे रेड झोन मध्ये आहे. जिल्ह्यातील गावागावात रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. यास तुळस गावहि अपवाद नाही, गावात रुग्णसंख्या नव्याने वाढताना दिसते. कोरोना आजारावर उपचारापेक्षा प्रतिबंध बरा यासाठी प्रतिष्ठाने यापूर्वीही जनजागृतीपर अनेक उपक्रम राबवून ग्रामस्थांमध्ये प्रबोधन करण्यात आले. यावेळीं तुळस गावातील प्रत्येक कुटुंबासाठी *आर्सेनिक अल्बम ३०* गोळ्या सरपंच शंकर घारे यांच्या कडे सुपूर्त केल्या. कोरोना संसर्ग वाढत असून कोरोनाच्या आपत्तीजनक परिस्थितीमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढीच्या दृरष्टीने शासनाच्या आदेशानुसार ‘आर्सेनिक अल्बम ३०’ हे होमिओपॅथिक औषध महत्वपूर्ण आहे. त्यानुसार गावातील ग्रामस्थांच्या सुरक्षितता आणि रोग प्रतिबंध या उद्देशाने गावात गोळ्या वितरित करण्यासाठी वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या वतीने आर्सेनिक अल्बम ३० गोळ्या सरपंच शंकर घारे यांचेकडे देण्यात आल्या. यावेळी प्रतिष्ठानचे सचिव प्रा सचिन परुळकर, गुरुदास तिरोडकर, ग्रामसेवक तुषार हळदणकर, मंदार तुळसकर,माधव तुळसकर, अजय नाईक,सागर सावंत, प्रथमेश सावंत,समर्थ तुळसकर,दिनानाथ साळगावकर आदी उपस्थित होते. वेताळ प्रतिष्ठानने कोरोना काळात मागील वर्षी पासून रक्तदान व जनजागृतीपर अनेक उपक्रम राबविले आहेतच आज पुन्हा तुळस ग्रामस्थांसाठी रोग प्रतिबंधक गोळ्या वितरित करून गावाप्रति आपुलकी आणि सामाजिक समरसतेचे दर्शन घडवून आणलेचे सांगत सरपंच घारे यांनी आभार व्यक्त केले.
वेताळ प्रतिष्ठानच्या तर्फे तुळस येथे आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप…
