जिल्ह्यातील आदर्शवत कोविड सेंटर म्हणून खारेपाटणची ओळख निर्माण करा…

खारेपाटण कोविड सेंटरचे प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी केले लोकार्पण

*💫कणकवली दि.०७-:* कोरोना या संकटाने आरोग्य यंत्रणेचे महत्त्व आणि गरज काय हे दाखवून दिली आहे.त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी आरोग्य मंदिरांना सढल हस्ते दान देऊन मदत केली पाहिजे. असे उदगार कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी खारेपाटण येथील कोविड केअर सेंटरच्या उदघाटन कार्यक्रम प्रसंगी काढले. जिल्ह्यातील एक आदर्शवत कोविड सेंटर म्हणून खारेपाटणची ओळख निर्माण व्हायला पाहिजे.व येथे दाखल झालेला रुग्ण समाधानाने बरा होऊन घरी गेला पाहिजे.असे मत यावेळी वैशाली राजमाने यांनी व्यक्त केले. खारेपाटण रामेश्वर नगर येथे खारेपाटण ग्रामपंचायत मालकीच्या असलेल्या नागरी सुविधा केंद्र इमारती मध्ये खारेपाटण ग्रामस्थांच्या आणि व्यापारी बांधवांच्या सहकार्यातून व खारेपाटण ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर लोकसहभागातून सर्व सोयी सुविधांयुक्त निर्माण करण्यात आलेल्या २५ बेडच्या कोविड केअर सेंटरच्या उदघाटन कार्यक्रमाला कणकवली तहसीलदार आर. जे. पवार,गटविकासअधिकारी अरुण चव्हाण,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय पोळ,जिल्हा डॉक्टर फेडरेशनचे अध्यक्ष डॉ.पाताडे, मंडळ अधिकारी मंगेश यादव,ग्रामविकास अधिकारी जि. सी. वेंगुर्लेकर,तलाठी ए. वाय. सिंगनाथ आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते. तर खारेपाटण येथे कोविड केअर सेंटर उभारणीमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक,महेश कोळसुलकर,संकेत शेट्ये,रुपेश सावंत ,रश्मी राऊत,यांचेसह खारेपाटण उपसरपंच इस्माईल मुकादम, प्रशांत गाठे, संदेश धुमाळे,परवेज पटेल,मोहन गेहलोत, ग्रामपंचयत सदस्य योगेश पाटणकर,महेंद्र गुरव,शंकर राऊत,उज्वला चिके, अंजली कुबल,आशा गुरव आदी मान्यवर पदाधीकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना प्रांतधिकारी राजमाने म्हणाल्या खारेपाटण येथील नागरिकांकडून काही तरी वेगळं काहीतरी शिकायला मिळते.खारेपाटण येथील ग्रामस्थांनी मिळून कोविड सेंटरसाठी घेतलेली मेहनत प्रशंसनीय तर आहेच पण जिल्ह्यातील एक आदर्शवत कोविड सेंटर म्हणून खारेपाटणची ओळख निर्माण व्हायला पाहिजे.व येथे दाखल झालेला रुग्ण समाधानाने बरा होऊन घरी गेला पाहिजे.असे मत यावेळी वैशाली राजमाने यांनी व्यक्त केले. तर यावेळी आरोग्य अधिकारी डॉ संजय पोळ व जिल्हा डॉक्टर फेडरेशनचे अध्यक्ष डॉ.पाताडे यांनी देखील आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. खारेपाटण येथे लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या या २५ बेडच्या कोविड केअर सेंटर साठी सर्व सोयी सुविधा निर्माण करण्यात आल्या असून सध्या इथे डॉ.बलराज येळकोटे,डॉ प्रसाद मालांडकर,डॉ भाग्यश्री बोडके,डॉ सुजित कदम हे कार्यरत असणार असून खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ प्रिया वडाम व डॉ पूजा ताडे डॉ.इंगवले यांचे नियंत्रण असणार आहे. खारेपाटण येथील कोविड सेंटरची पूर्ण पाहणी यावेळी मान्यवर मंडळींनी केली व समाधान व्यक्त केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मंगेश गुरव यांनी मानले तर सर्वांचे आभार संतोष पाटणकर यांनी मानले.

You cannot copy content of this page