कोरोना साथ ओसरल्यावर मोठे आंदोलन ऊभारणार:प्रदीप मांजरेकर
*💫कणकवली दि.०७-:* केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. आज आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 64 डाँलर प्रती बँरल एवढ्या कमी असतानाही पेट्रोल डिझेलचे दर भरमसाठ वाढवलेले आहेत मोदी सरकार हे सामान्य जनतेचे नसुन ते फक्त मुठभर धनदांडग्या ऊद्योगपतींसाठी काम करत आहे . असे मत काँग्रेस कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी व्यक्त केले. कोरोना साथ ओसरल्यावर यापेक्षा मोठे आंदोलन ऊभारण्याचा ईशाराही यावेळी देण्यात आला केंद्र सरकारच्या अन्यायी पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरवाढीविरोधात कणकवली पेट्रोलपंपासमोर काँग्रेस कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.यावेळी प्रविण वरुनकर, निलेश मालंडकर, प्रदीप तळगावकर ,पंढरी पांगम ,संदीप कदम संतोष तेली ,प्रदीपकुमार जाधव, परेश एकावडे आदी कार्यकर्ते ऊपस्थित होते. पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल १०० रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅसही ९०० रुपये झाला आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहेत. मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलमधून कराच्या रुपाने लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला मात्र महागाईच्या खाईत लोटले आहे. युपीए सरकार असताना पेट्रोलवर एक्साईज ड्युटी ९.४८ रुपये होती ती आज ३२.९० रुपये म्हणजे २५८ टक्के आहे तर डिझेलवर ३.५६ रुपये होती ती आज ३१.८० रुपये आहे म्हणजे ८२० टक्के वाढ. या एक्साईज ड्युटीतून मोदी सरकारने गेल्या ७ वर्षात तब्बल २० ते २५ लाख कोटी रुपयांची लुटमारी केली आहे. तसेच २००१ ते २०१४ या चौदा वर्षाच्या काळात पेट्रोल डिझेलवर प्रति लिटर १ रुपया सेंट्रल रोड फंड सेस लावला जात होता. २०१८ मध्ये याचे नाव तो १८ रु. प्रतिलिटर केला. सध्या पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर १८ रु. सेंट्रल रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंडासाठी घेतले जातात. तसेच पेट्रोलवर प्रति लिटर २.५० तर डिझेलवर प्रती लिटर 4 रु क्रुषीसेस घेतला जातो या दरोडेखोरी विरोधात जनतेचे लक्ष वेधण्यासाठी आज निषेध व्यक्त केला. केंद्रात मनमोहनसिंग सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 110 डाँलर प्रती बँरल असताना देशांतर्गत किंमतीवर त्याचा परिणाम होवु दिला नाही .सामान्य लोकांना दिलासा देण्याची भुमिका त्यांनी घेतली होती.
