Headlines

कोलगाव निरुखे शाळेतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार…

विहिरीसाठी निधी मंजूर;
दीपक केसरकर व संजू परब यांच्या माध्यमातून निधी मंजूर;विद्यार्थी, पालक व शिक्षकांकडून समाधान..

⚡सावंतवाडी ता.०३-: येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ मधील विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती. उपलब्ध पाण्याचे प्रमाण अपुरे असल्याने विद्यार्थी तसेच शिक्षकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. विद्यमान आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या माध्यमातून शाळेसाठी विहीर बांधण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे शाळेतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होणार आहे.

विहिरीचे काम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शाळेतील मूलभूत सुविधांच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या कामासाठी शिवसेना उपतालुकाप्रमुख राकेश पवार, पंचायत समिती सदस्या प्रणाली टिळवे, रोहित नाईक, आशिका सावंत, उगवेकर, अभिजित टिकले, विजय टिकले, संजय पवार, सुशांत ठाकूर, विवेक टोपले, विदेश धरी, शीतल टिकले, गौरव कडाळकर, मुकेश ठाकूर, युवराज राणे, राजेंद्र निर्गुण, आदेश गावडे, रविकिरण राऊत, नजीर शेख, योगिनी करमळकर, दिलेश जाधव, भैय्या राऊत आदी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.”

You cannot copy content of this page