युवासेना शहर अधिकारी विशाल सावंत यांचे मत
*💫सावंतवाडी दि.०५-:* शहरात काल घडलेला प्रकार हा निंदनीय असून, असे प्रकार शांत आणि सुसंस्कृत शहरात घडणे उचित नाही. असे मत व्यक्त करत काल सेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी नगराध्यक्षांच्या राजीनाम्याची केलेली मागणी योग्यच असल्याचे युवासेना सावंतवाडी शहर अधिकारी विशाल सावंत यांनी स्पष्ट केले आहे. शहरात सत्तांतर झाल्यानंतर या प्रकारांना उत येताना दिसत असून, कालचा प्रकार हा पार्किंगच्या वादातून झाल्याचे दिसत आहे. शहरातील पार्किंग नगरपालिकेच्या अंतर्गत येत असताना त्या ठिकाणी खुलेआम गाड्या पार्क केल्या जात असताना त्यावर पालिकेचे नियोजन का नाही? असा सवाल विशाल सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. पालिकेने योग्य नियोजन केले असते तर कालचा प्रकार घडला नसता. त्यामुळे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी नगराध्यक्ष संजू परब यांच्या राजीनाम्याची केलेली मागणी योग्यच आहे. त्यामुळे निशांत तोरसकर यांनी रुपेश राऊळ यांना सल्ला देण्यापेक्षा कालच्या प्रकरणाची दखल घेऊन वरिष्ठांना कळवावे. आणि शहरात असा प्रकार पुन्हा घडणार नाही यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले आहे.
