कणकवली वनपरिक्षेत्र कार्यालय येथे झाडे लावून पर्यावरण दिन साजरा…

*💫कणकवली दि.०५-:* जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कणकवली वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात वनक्षेत्रपाल कणकवली यांच्यावतीने वनक्षेत्रपाल रा.ध.घुनकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र कार्यालय कणकवलीच्या परिसरात लिंबू ,अशोक, व बेल ही झाडे लावून साजरा करण्यात आला. पर्यावरणाचे संवर्धन करूया जीवन अधिक सुंदर बनवूया हा संदेश जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शासन देत आहे.५ जून रोजी आयोजित या कार्यक्रमाला भिरवंडे वनपाल सुतार , भिरवडे वनरक्षक राठोड, वनरक्षक नाटळ राख , वनरक्षक कुंभवडे वैशाली कुंभार तसेच वनमजूर गावकर ,तांबे, गुडेकर, लेखापाल आंबेरकर व ग्रामस्थ उपस्थित होते

You cannot copy content of this page