*सर्वोदय नगर येथे करण्यात आले वृक्षारोपण
💫 *सावंतवाडी दि.०५-:* जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब सावंतवाडी यांच्या वतीने सावंतवाडी येथील सर्वोदय नगरमध्ये झाडांची रोपे लावून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. पर्यावरणात झाडांना अनन्य साधारण महत्त्व असून प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगवले पाहिजे असे लायन्स क्लबच्या वतीने आवाहन करण्यात आले. या वेळी क्लबचे सदस्य ला.अशोक देसाई,ला.परिमल नाईक, ला. अमेय पई, ला. विद्याधर तावडे,ला. रवींद्र सावंत, ला. संतोष चोडणकर, ला. राजन पोकळे, ला. गजानन नाईक,ला. बाळ बोर्डेकर,ला. संदेश परब, ला. नरेंद्र देशपांडे, ला जितेंद्र गावकर, ला. गुणाजी गावडे , ला. डॉ. गौरव जाधव आदी लायन्स सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
