२०२०-२१ मध्ये जी प चा खर्च ६७ टक्केच

वित्त समिती सभेतील माहिती

*💫ओरोस दि.०४-:* २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषदेचे स्वनिधी बजेट २१ कोटी ३५ लाख एवढे होते. यातील मार्च २०२१ अखेर केवळ १४ कोटी ३१ लाख ५५ हजार ७४ रुपये खर्च झाले आहेत. ६७ टक्के हा खर्च आहे. याबाबतची माहिती शुक्रवारी झालेल्या वित्त समिती सभेत लेखा व वित्त अधिकारी मदन भीसे यानी सांगितले. जिल्हा परिषदेच्या वित्त समितिची सभा सभापती महेंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने शुक्रवारी सकाळी संपन्न झाली. यावेळी वित्त व लेखा अधिकारी मदन भीसे, सदस्य अनघा राणे, गणेश राणे, संजय देसाई यांच्यासह खातेप्रमुख व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page