ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांच्या हस्ते विलगीकरण कक्षाचे उद्घाटन
*💫कणकवली दि.०४-:* मालवण तालुक्यातील किर्लोस ग्रामपंचायतीमार्फत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा किर्लोस गावठण येथे संरथात्मक विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यावेळी ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांच्या हस्ते विलगीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. विलगीकरण कक्षाचे उद्घाटनप्रसंगी किर्लोस गावचे सरपंच प्रदीप सावंत, उपसरपंच दिपक किर्लोस्कर, ग्रामसेवक दत्तप्रसाद रावले, पोलीस पाटील किशोर लाड, तंटामुक्त समिती अध्यक्ष दशरथ घाडीगावकर, प्रविण घाडीगांवकर, प्राथमिक आरोग्य केंद्र हिवाळे अधिकारी डॉ. खरे तसेच कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी किर्लोस आबवणे गावासाठी ४५ वर्षा वरील नागरिकांना कोव्हिशिल्ड लसीकरण करण्यात आले.
