आ. नितेश राणेंनी ‘ त्या ‘ नाही ‘सावंतवाडीच्या परबांचा’ राजीनामा घ्यावा

*शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांचा टोला*

*💫सावंतवाडी दि.०४-:* शांत आणि सुसंस्कृत सावंतवाडी शहरात सत्तांतर झाल्यानंतर वेळोवेळी शहरात वाद होत असून, शहरात आज घडलेला प्रकार चुकीचा असून, त्यामुळे शहराचे नाव बदनाम होत आहे. शहरातील नागरिकांनी पुन्हा एकदा सत्तेची गुर्मी अनुभवली असल्याचे मत सेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. आजचा प्रकार हा नगराध्यक्ष यांच्या समोर उपनगराध्यक्ष यांच्या घरात झाला असून, हे जनतेचे रक्षण काय करणार असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून संजू परब यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

निवडणुकीच्या वेळी शहरात येऊन नागरिकांना मोठी मोठी आश्वासने देणारे आमदार नितेश राणे दिली होती. परंतु ती आश्वासने पूर्ण होताना दिसत नाही आहेत. परंतु, शहरात राडे संस्कृतीचा उदय झाला आहे. असे देखील ते म्हणाले आहेत. त्यामुळे नितेश राणेंनी त्या परबांचा राजीनामा घेण्यापेक्षा सावंतवाडीच्या परबांचा राजीनामा घ्यावा असा टोला लगावला आहे.

You cannot copy content of this page