पं. स. सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबु सावंत यांचा अधिकाऱ्यांना इशारा : पंचायत समितीची मासिक बैठक
*💫सावंतवाडी दि.०४-:* सोनुर्ली येथील तुटलेला पाणलोटचा बंधारा दुरुस्त न करता तो नव्याने बांधावा अन्यथा आपण यासंदर्भात न्यायालयात दाद मागणार असा इशारा आज पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबु सावंत यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिला. सदर कामात ठेक्यांची चुक नसुन अधिकाऱ्यांची आहे कारण अधिकाऱ्याची कामाची पाहणी करणे गरजेचे असतांना अधिकार्यानी त्याकडे दुर्लक्ष केले त्याचा फटका शेतकर्यांना सहन करावा लागत आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. पंचायत समितीची मासिक बैठक सभापती सौ निकिता सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जून मीटिंग द्वारे पार पडली. यावेळी विविध विषयावर चर्चा झाली, आरोग्य बांधकाम पाणीटंचाई वीज वितरण आदी विषया यावर सखोल चर्चा करण्यात आली
