४५ वर्षावरिल लसिकरणास दोडामार्गमध्ये वेग

आरोग्य सभापती डॉ अनिशा दळवींच्या नेतृत्वाखाली तालूका प्रशासनाचे नियोजन

*💫दोडामार्ग दि.०४-:* कोविड १९ साठीच्या लसीकरण मोहीमेमध्ये आता ४५ वर्षांवरील सगळ्यांना प्राधान्यक्रमाने लस देण्यात येत आहे.आम.नितेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली व सिंधुदुर्ग जिल्हा परीषद शिक्षण आरोग्य सभापती डॉ.अनिषा दळवी यांच्या सहकार्याने दोडामार्ग तालुक्यात आरोग्य विभागाने कोविड १९ लसीकरणास वेग घेतला आहे.सर्व आरोग्य कर्मचारी यांच्या एकत्रित नियोजनातून गावागावात कोविड लसीकरण होत आहे. लसीकरणाच्या या महत्वाच्या टप्यात दोडामार्ग शहरवासीय या लसीकरण प्रक्रियेतून वंचित राहू नयेत या हेतूने दोडामार्गचे माजी उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी शहरात वॉर्डनिहाय लसीकरणावर भर देण्याचा मानस व्यक्त करुन प्रशासनाकडे तशी मागणी केली आहे.श्री.चव्हाण यांचेसह मा.नगरसेवक सुधीर पनवेलकर,देविदास गवस,चंद्रकांत खडपकर आदींनी सदर मागणी लावून धरली आहे.त्यामुळे दळणवळणाच्या सोई उपलब्ध नसल्यामुळे दोडामार्ग शहरात लवकरच वॉर्डनिहाय लसीकरणावर भर देण्यात येईलअसे श्री.चेतन चव्हाण यांनी सांगितले.

You cannot copy content of this page